जनावर चोरीचा गुन्हा रात्रीतूनच उघड; एका आरोपीस अटक, चोरीस गेलेली तिन्ही जनावरे हस्तगत. उदगीर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. लातूर जिल्ह्य चीफ ब्युरो विनोद कांबळे

            
उदगीर दिनांक२७/१०/२०२६ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जनावरे चोरीस गेल्याच्या घटनेचा उदगीर ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने तपास करून रात्रीतूनच छडा लावला आहे. या गुन्ह्यात एका आरोपीस अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेली तिन्ही जनावरे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिनांक 24 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून ते दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 3.00 वाजेच्या दरम्यान, गणेशनगर, येणकी रोड, उदगीर येथील फिर्यादी प्रकाश मनोहर चव्हाण (वय 32 वर्षे, व्यवसाय शेती) यांच्या राहत्या घरासमोरील गोठ्यातून अज्ञात चोरट्याने दोन मुरा जातीच्या वगारी व एक मुरा जातीचे हालगट अशी एकूण तीन जनावरे चोरून नेली होती. चोरीस गेलेल्या जनावरांची एकूण किंमत अंदाजे 70,000 रुपये होती. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 760/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करून गुन्ह्याचा रात्रीतूनच छडा लावला. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेली तिन्ही जनावरे हस्तगत करण्यात आली आहेत.जनावर चोरीच्या गुन्ह्याची तत्परतेने उकल करून चोरीस गेलेली जनावरे परत मिळवून देण्यात उदगीर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार केंद्रे करीत आहेत.