पोलीस क्राईम न्यूज शशिकांत भालेराव जिल्हा चीफ ब्युरो नाशिक नाशिक ता.19/10/2026 रोजी चांदवड तालुक्यातील वागदर्डी शिवारातील शिंगवे रस्त्यावरील धरणाजवळ दोन इसम मन प्रभावी अशा अंमली गांजा पदार्थांची विक्री वाहतुक करत आहे अशी गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने  चांदवड नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक अभिजीत सोनवणे, सहा पो निरीक्षक अमोल मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पो हवा. सुभाष चोपडा, संदिप महाजन, योगेश कोळी तसेच चांदवड पो. ठाण्याचे पो. उप निरीक्षक भाऊसाहेब गुळे पो. हवा अमोल जाधव, चेतन बागल, दिनेश सुळ, राजु गायकवाड, स्वप्निल रंधे, प्रदीप आजगे, योगेश हटकर, विक्रम बस्ते, यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून गांजा तस्करी करणारे आरोपी नामे 1) आनंद पांडूरंग परदेशीवय 47 वर्षे रा. संभाजीनगर मनमाड तालुका नांदगांव जि. नाशिक.2) संजय काशीनाथ शिंदे वय 57 वर्षे रा.रापली तालुका चांदवड जि. नाशिक यांना17.20 वा. जागेवर पकडून दोन पंचा समक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या कडून 4 किलो351 ग्रॅम गांजा रु.95,722 तसेच सुझुकी बर्गमन मोटार सायकल रजि नंबर MH-41-BW8808 आणि बजाज कंपनीची प्लेटीना मोटार सायकल MH-41-BZ9488 आढळून आल्याने पो.निरीक्षकअभिजित सोनवणे यांनी जप्ती पंचनामा करून आरोपींना सदरच्या घटनेची चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरीक्षक दत्ता कांभिरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चांदवड पो.ठाणे येथे अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (C), 20(B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मा पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा. पोनि. अमोल मोरे करीत आहे.